दोन आंतरराष्ट्रीय समलैंगिक महिला क्रिकेटपटूंनी बांधली लग्नगाठ

232

न्यूझीलंड, दि. १९ (पीसीबी) – न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेली जेनसन आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू निकोला हॅनकॉक या दोघी लग्नबंधनात अडकल्या. या दोघींच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेलबर्न स्टार्सनं अधिकृत ट्विटर हँडलवरून नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर करून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेली जेनसन ही न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व करताना सात एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळली आहे. तर तिची जोडीदार निकोला हॅनकॉक ऑस्ट्रेलियाची असून, ती स्थानिक क्रिकेट संघातून खेळते. बिग बॅश लिगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून ती खेळते.

याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू डेन वॅन निकेर्कनं संघ सहकारी मॅरिजाने कॅप हिच्याशी लग्न केलं होतं. मॅरिजाने ही दक्षिण आफ्रिका संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. तर २५ वर्षीय निकेर्क ही फिरकीपटू आहे.