दोन वर्षीय मुलाचा विळीने गळा चिरून आईचीही आत्महत्या

572

ईट, दि. ९ (पीसीबी) – भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील एका आईने  स्वत:च्या २ वर्षीय मुलाचा विळीने गळा चिरून, स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.८) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

शुभांगी पवार (वय ३०) आणि कौस्तुभ पवार (वय २) असे मयत मायलेकाची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटनांदूर येथील रामदास पवार हे वडील, पत्नी शुभांगी व दोन वर्षांच्या कौस्तुभसह राहतात. शनिवारी सकाळी ते बैलपोळ्याच्या सणाची खरेदीसाठी ईट येथे गेले. घरी असलेल्या शुभांगी यांनी मुलगा कौस्तुभ याचा घरातील विळीने गळा चिरून हत्या करत त्याचा मृतदेह लोखंडी दिवाणवर रग टाकून झाकला. त्यानंतर स्वत:ही साडीने माळवदाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजता रामदास व त्यांचे वडील घरी परतल्यानंतर घडला प्रकार समोर आला. या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. भूम पोलिस तपास करत आहेत.