देहूरोड येथे लष्कराच्या ट्रकच्या धडकेत पादचारी वृध्दाचा मृत्यू

124

देहूरोड, दि. १५ (पीसीबी) – पायी चालेल्या एका ५९ वृध्दा इसमाला लष्कराच्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१३) सकाळी सव्वा सातच्या सुमारास देहूरोड येथील जुना पुणे-मुंबई रस्त्या लगतच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपा शेजारील कॉन्टोंमेंन्ट ते डिफेन्स सिनेमा थिएटर येथे घडली.  

काशीनाथ विठोबा नंदकर (वय ५९) असे मयत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आर. यु इघारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालक जे.व्यंकटेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास देहूरोड येथील जुना पुणे-मुंबई रस्त्या लगतच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपा शेजारील कॉन्टोंमेंन्ट ते डिफेन्स सिनेमा थिएटर रस्त्यावरुन ५९ वर्षीय काशीनाथ हे पायी चालले होते. यावेळी मागून लष्कराचा स्टेलन गाडी (क्र.00E/015376E) घेऊन येत असलेला चालक जे.व्यंकटेश याने काशीनाथ यांना जोरदार धडक दिली. यामध्ये काशीनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.