देहूरोड येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

44

देहूरोड, दि. २१ (पीसीबी) – देहूरोड मधील स्वामी चौकात असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 20) पहाटे घडली.

पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड मधील स्वामी चौकात अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. एटीएमच्या समोरील लॉक तोडून पत्र्याचा दरवाजा उघडला. आतील कि बोर्ड काढून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम सेंटर मध्ये बँकेने सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांनी बँकांना लेखी सूचना दिल्या आहेत. तरी देखील बँकेने एटीएम सेंटर मध्ये सुरक्षा रक्षक नेमला नाही. बँकेने ज्या एजन्सीला एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे, त्या कंपनीच्या संबंधितांविरोधात देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare