देहूरोड येथील संदीपच्या टपाल तिकीटांच्या संग्रहाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

177

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – आजोबा स्वातंत्र्य सैनिक. त्यांची प्रेरणा घेऊन एक तरूण भारतीय लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगतो. मात्र, काही अडचणीमुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, हे स्वप्न पूर्ण न झाल्याने तो खचत नाही, तर देशाप्रती समर्पणाची भावना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो अनोखा छंद जोपासण्याचा निर्णय घेतो. देहूरोड येथे राहणारा संदीप रमेश बोयत यांने ‘पीसीबी’ बोलताना आपल्या टपाल तिकीटांच्या छंदाचा प्रवास उलगडला.   

संदीपच्या या छंदाची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे. या छंदाविषयी त्यांने सांगितले की, मला देशविषयी खूप प्रेम आहे. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द् मनामध्ये होती. त्यासाठी लष्करात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते. मात्र, काही अडचणीमुळे ते सत्यात उतरले नाही. मात्र, निराशा झालो नाही. देशभक्तीची भावना मनात कायम होती. त्यानंतर एक छोटासा विचार मनामध्ये आला.

स्वातंत्र्य संग्रामातील स्वतंत्र्य सेनानी यांनी देशासाठी रक्त गोठवले, जर आपण त्यांच्या नावाने काढलेल्या टपाल तिकीटांचा संग्रह केला, तर या माध्यमातून आपल्याकडून त्यांना मानवंदनाही दिली जाईल. आपली देशभक्तीची भावनाही कायम राहील. हा त्यामागचा मूळ हेतू होता.

माझे आजोबा रिसाला नंदू पारस यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सहभागी होऊन आपले सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. भारतीय लष्कराने त्यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाबद्द्ल गौरव करून सन्मानपत्र दिले आहे. हीच आजोबांची प्रेरणा घेऊन टपाल तिकीटांचा संग्रह करण्यास सुरूवात केली.

१९४७ ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा पहिले भारत ध्वजाचे छायाचित्र असलेले तिकीट टपाल खात्याने काढले होते. यासह स्वातंत्र्य काळातील सर्व टपाल तिकीटांचा संग्रह माझ्याकडे आहे. लोकमान्य टिळक, विदा सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, महाराणा प्रताप यांचे छायाचित्र असलेली टपाल तिकीटे माझ्या संग्रही आहेत. या संग्रहाची दखल घेऊन २०१६ मध्ये ‘माझी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. याबाबत सन्मानपत्र देऊन मला गौरविण्यात आले आहे, असे संदिपने सांगितले.