देहूरोड येथील घोरावडेश्वर डोंगरावर वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

72

भोसरी, दि. २८ (पीसीबी) –  निगडीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग आणि निसर्ग मित्र विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देहुरोडजवळील घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिमेनिमित्त वडाचे पूजन करून व वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

वटपोर्णिमेनिमित्त दरवर्षी या डोंगरावर महिला वडाची झाडे लावतात व स्वतः लावलेल्या वडाची पूजा करतात. विषेशत वडाच्या फांद्या विकत आणून त्याची पूजा करु नये, त्यामुळे सणाचा मुख्य उद्देश बाजूला पडून अनेक वटवृक्षाचे जीवनच संपते, यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प राबविण्यात आला.

यावेळी डॉ. सुनिता, डॉ. सुजाता डॉ. हुईलगोळकर, प्रा. निता मोहीते, वैशाली जोशी, मुक्ता चैतन्य, सुखदा भोंसुले, नीता पाटील, विनीता पाचारणे, सुमती कुलकर्णी, उल्का अत्रे, राजश्री व्यास, शारदा रिकामे यांचेसह आदी महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. तर अनुजा वनपाळ, माधुरी मापारी, विनिता श्रीखंडे व मानसी म्हस्के यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.