देहूरोडमध्ये पोटच्या १२ वर्षीय मुलीवर नराधम बापाने केला लैंगिक अत्याचार

64

देहूरोडमध्ये वडिल-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका नराधमान बापाने पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटन मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली आहे.

या प्रकरणी नराधम बापाला देहूरोड पोलीसांनी अटक केली आहे.  तर पिडीत मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१०) देहूरोड परिसरात राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांनीच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीची आई मंगळवारी नातेवाईकांकडे गेली होती. तर पीडित मुलीचा लहान भाऊ बाहेर खेळायला गेला होता. तर मोठ्या भावाला  नराधम बापाने जाणून बुजून किराणा आणण्यासाठी दुकानावर पाठवले होते. त्यानंतर त्या नराधम बापाने अल्पवयीन मुलीला घराच्या हॉलमध्ये बोलवत कोयत्याच्या धाकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबद्दल कोणाला काही सांगितल्या जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मात्र पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या काकूला सांगितला. मुलीच्या काकूने तातडीने मुलीच्या आईला फोन करुन  झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आज (शुक्रवारी) पहाटे याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात त्या नराधम बापा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी पोलीसांनी मुलीची चौकशी केली असता ‘माझे वडील गेल्या वर्षभरापासून माझ्याशी अश्लील वर्तन करत आहेत’ अशी कबुली  मुलीने दिली आहे.