देहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान

399

देहूरोड, दि. २० (पीसीबी) – देहूरोड येथील जन्या मुंबई-पुणे महामार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाखाली ट्रेलर ट्रकचा ब्रेक फेल होऊ झालेल्या विचित्र अपघातात चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी  झालेले नाही. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड येथील जन्या मुंबई-पुणे महामार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाखालून ट्रेलर ट्रक (जीजे१२ एझेड १४४) हा जात होता. यावेळी अचानक त्याचा ब्रेक फेल झाला. यामुळे त्याने कुर्ला-सांगोला एसटी बस (एमएच१४ बीटी ४७११), आयट्वेंटी (एमएच १४ इएच ४७८२), स्विफ्ट (जीजे०६ केएच २०३४) आणि अल्टो (एमएच १४ डीटी ०२५७) या वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.