देहुरोडमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

195

देहुरोड, दि. १९ (पीसीबी) – लोणावळ्याकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या लोणावळा-पुणे लोकल ट्रेनच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. १८) रात्री नऊच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ घडली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या लोणावळा-पुणे लोकल देहुरोड स्टेशन येथून जात होती. इतक्या रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्या तरुणाला रेल्वेची जोरदार धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. रेल्वे पोलिसांनी त्याचे वर्णन जारी केले आहे.

त्याचे वर्णन पुढील प्रमाणे, वय अंदाजे ३५ वर्ष आहे. उंची ५.२ फूट आहे. अंगात राखाडी रंगाचा फूल शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या वर्णनाच्या व्यक्तीस कोणी ओळखत असेल त्यांनी त्वरीत देहुरोड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.