देहुरोडमध्ये रस्त्यात आडवा आल्याने तिघांनी केले तरुणावर वार

1080

देहुरोड, दि. २६ (पीसीबी) –  मारण्यासाठी तरुणाचा पाठलाग करत असताना दुसरा एक तरुण अचानक रस्त्यात आल्याने त्याचा धक्का आरोपींना लागला व ज्याला मारायचे होते तो पळून गेला. याचा राग मनात धरुन तिघा जणांच्या टोळक्यांनी अचानक रस्त्यामध्ये आलेल्या त्या तरुणावर वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास देहुरोड येथील गांधीनगरमध्ये घडली.

सुरेश मुन्ना अवचिते (वय २३, रा. गांधीनगर, देहुरोड) असे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी सलमान मेहबुब शेख, शहारुख मेहबुब शेख आणि नौशाद नजिर शेख (तिघेही रा. आंबेडकरनगर, देहुरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास देहुरोड येथील गांधीनगरमध्ये आरोपी सलमान, शहारुख आणि नौशाद हे तिघे संदिप खणसे या तरुणाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करत होते. यावेळी फिर्यादी सुरेश अवचिते हा अचानक त्यांच्या रस्त्यात आला आणि त्याचा धक्का आरोपींना लागला. यादरम्यान सुरेश अवचिते पळून गेला. या गोष्टीचा राग मनात धरुन तिघा आरोपींनी सुरेश याला जबर मारहाण करुन त्यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केले आणि पसार झाले. देहुरोड पोलिस तपास करत आहेत.