देहुरोडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन कोयत्याने वार

132

देहुरोड, दि. १० (पीसीबी) – काकांच्या घराबाहेर उभा असलेल्या एका तरुणाला पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सहाजणांच्या टोळक्यांनी अपहरण करुन कोयत्याने वार केले. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.८) रात्री नऊच्या सुमारास देहुरोड शिवाजीनगर येथील दत्तमंदिराच्या पाठीमागच्या बाजुस घडली.

अरबाज मेहमूद शेख (वय २०, रा. दत्तमंदिराच्या पाठीमागे, शिवाजीनगर देहुरोड) असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबीन उर्फ बुग्गी शेख, चिक्कु, संदिप खनसे, विजय खनसे, अमिन शेख आणि सुऱ्या या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास जखमी अरबाज हा त्याचे काका हिदायत शेख यांच्या शितळानगर येथील घरी गेला होता. काकांच्या घराबाहेर उभा असताना सहा आरोपी तेथे आले. त्यातील बुग्गीने याने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन अरबाजला कोयता फेकून मारला. यामध्ये अरबाजच्या उजव्या हातांच्या बोटांना आणि कोपऱ्याला दुखापत झाली. आरोपी इक्यावरच थांबले नाही त्यांनी अरबाजला जबरदस्ती दुचाकीवरुन बसवून पुंडीचाळ येथे नेले. तेथे देखील चिक्कु या आरोपीने अरबाजच्या उजव्या हातावर वार केला. यानंतर अरबाजने कसाबसा आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. तसेच त्याला शोधत आलेल्या काकांच्या गाडीवर बसून थेट देहुरोड पोलीस ठाणे गाठले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.