देशी विदेशी दारू आणि गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल

154

वाकड, दि. २१ (पीसीबी) – देशी विदेशी दारू आणि गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून 43 हजार 925 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) दुपारी म्हातोबानगर झोपडपट्टी वाकड येथे करण्यात आली.

पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबानगर झोपडपट्टी येथील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या टपरीमध्ये देशी-विदेशी दारू आणि गांजा विक्री सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजता टपरीवर कारवाई करून 593 ग्रॅम गांजा, देशी विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या असा एकूण 43 हजार 925 रुपयांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.