देशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर

139

पुणे, दि. २० (पीसीबी) – गेल्या पाच वर्षांत देशातील विचारवंताच्या हत्या घडत आहेत. या कृतीतून विचारवंतांचा आवाज दाबण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी आज (सोमवार) येथे केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालेकर बोलत होते. ते म्हणाले की, नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर आणखी चार हत्या झाल्या आहेत. दाभोलकर यांची हत्या होऊन पाच वर्षांचा काळ लोटला आहे.

नुकतेच या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. यावरून हत्या घडवणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास आणखी किती वेळ लागणार असा सवालही पालेकर यांनी यांनी यावेळी उपस्थित केला. तपास यंत्रणांमध्ये समन्वय नसून आता ज्या आरोपींना अटक झाली आहे, त्यांना तातडीने शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.