देशाची वाटचाल हिटलरशाहीकडे; धर्माच्या नावावर जीव घेण्याचे प्रकार – मल्लिकार्जुन खरगे

65

कोल्हापूर, दि. ३१ (पीसीबी) – केंद्र सरकार असो किंवा राज्यातील सरकार दोन्हींकडे खोटी आश्वासने दिली जातात. खोटे बोलून सत्ता मिळवण्याची कला नरेंद्र मोदी यांनी हिटलरपासून शिकली आहे. देशातही आता हिटलरशाही सुरु आहे, असा घणाघात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (शुक्रवारी) येथे कोल्हापूरमध्ये केला. धर्माच्या नावावर दुसऱ्याचे जीव घेण्याचे प्रकार चालू असून ते आम्ही खपवून घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.