देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

64

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्यानं केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूक सेवा बंद केली होती. मात्र, केंद्र सरकारनं जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना मुळे विदेशातील तसेच देशातीलही सर्व विमान वाहतुकीला बंदी होती. तिसऱ्या टाळेबंदिंतर हवाई वाहतुकीला काही प्रमाणात सुरवात झाली. विदेशात अडकलेल्या भारतीयांनी परत आणण्यात आले. आता देशआंतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्याने सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले. उद्योग व्यापार ठप्प झाल्याने आर्थिक उलाढाल बंद होती. आता हवाई वाहतू सुरू झाल्यावर ती पूर्वपदावर येईल असा अंदाज आहे.

WhatsAppShare