देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज

116

नवी दिल्ली, दि.३ (पीसीबी) – देशातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीर, तमिळनाडू, आसाम आणि गुजरातमध्ये शुक्रवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल, असे विभागाने म्हटले आहे.
मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने गेल्या आठवड्यात दिली होती. अपेक्षित वेळेच्या १७ दिवस आधीच मान्सून भारतभर पसरल्याची माहितीही विभागाने दिली होती. विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश या भागांतही जोरदार पाऊस होईल, असे विभागाने सांगितले आहे. उत्तर हरियाणा, चंडीगड, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कोकण आणि गोवा; तसेच रायलसीमा, तमिनळनाडू, लक्षद्वीप आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.