देशद्रोहाप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

244

इस्लामाबाद,दि.१७ (पीसीबी) –पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांना देशद्रोह करण्याप्रकरणी लाहोर हायकोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावलीय. देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. मुशर्रफ यांनी पाकिस्तानात ३ नोव्हेंबर २००७ ला आणीबाणी जाहीर केल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.

२०१३ पासून त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी प्रलंबित होती. त्यानंतर मुशर्रफ यांनी प्रकृतीचं कारण देत मार्च २०१६मध्ये दुबईला दुबईला गेले होते.मात्र तेव्हापासून ते पाकिस्तानात परतलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानातील न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं. आज कोर्टाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.