देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कोणी खुर्ची देते का खुर्ची

59

पणजी, दि. २० (पीसीबी) : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीवरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत आहे. एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “आम्ही सोंगाडे नाही, देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी झाली आहे” अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

संजय राऊत यांनी गोव्यात पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर आपले मत मांडले. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना नटसम्राटाची उपमा दिली होती. याचा संजय राऊत यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. नटसम्राटाची उपमा देणाऱ्या फडणवीस यांच्यावर राऊत यांनी यावेळी हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, “नटसम्राट हे महाराष्ट्राचं खूप मोठं वैभव आहे. आम्ही नटसम्राट आहे. मात्र शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही.”

गोवा विधानसभेसाठी शिवसेनेची दहा उमेदवारांची यादी तयार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राजकीय पक्षांनी गोव्याची प्रयोगशाळा केली आहे. गोव्यात आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
काल नगरपंचायतींचा निकाल लागला. त्यात भाजप राज्यात एक नंबरचा ठरला आहे, याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “भाजप हा राज्यत एक नंबरचा विरोधी पक्ष आहे. कालच्या निकालातून त्यांनी त्यांचं एक नंबरचं स्थान कायम ठेवल्याबद्दल भाजपचं अभिनंदन करतो, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

दरम्यान, “गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पत पर्रिकर यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.