देवले येथे पाण्याच्या टाकीसाठी खासदार फंडातून दहा लाख रूपये मंजूर

132
मळवली, दि.२७ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील देवले गाव येथे पाण्याच्या टाकीचे काल मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या पाण्याच्या टाकीसाठी खासदार श्रीरंग बारणे  यांच्या फंडातून दहा लाख रूपये मंजूर करण्यात आला आहे.
या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हाप्रमूख शरद हुलावळे आणि उपतालुका प्रमुख मावळ गबळू ठोंबरे याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, देवले गावचे सरपंच महेंद्र आंबेकर, उपसरपंच राजेश फुणसे, ग्रामसेविका तेजस्विनी माने, ग्रामपंचायत सदस्य निलेश फाटक, संतोष गिरी, सदस्या मंगल आंबेकर, अश्विनी आंबेकर, शारदा उंबरकर, सुरेखा जगताप,  संदिप आंबेकर, भरत आंबेकर, विठ्ठल आंबेकर, गोपाळ आंबेकर, सोमनाथ आंबेकर, किसन गायकवाड, नंदा आंबेकर, नरेश वाल्हेकर, बाळू ठोंबरे, सागर ठोसर, दत्ता आंबेकर, संतोष कडू यांच्यासह देवले ग्रामस्थ उपस्थित होते.