दूध घेऊन घरी जात असलेल्या वृद्ध महिलेचे गंठण हिसकावले

19

आकुर्डी, दि. २१ (पीसीबी) – सकाळच्या वेळी दुकानातून दूध खरेदी करून घरी जात असलेल्या ६६ वर्षीय वृद्ध महिलेचे सोन्याचे गंठण दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी प्राधिकरण आकुर्डी येथे घडली. वृद्ध महिला आजारी असल्याने त्यांनी याबाबत 20 डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे.

शारदा शांताराम रणनवरे (वय 66, रा. प्राधिकरण आकुर्डी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी रणनवरे घराजवळ असलेल्या दुकानातून दूध घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर तो चोरटा काही अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. फिर्यादी या आजारी असल्याने त्यांनी त्यावेळी फिर्याद दिली नाही. आजारपणातून बरे झाल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare