दूध आणि मर्सिडीज गाडीवर सारखाच कर लावता येईल का? – पंतप्रधान मोदी

61

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – सर्व वस्तूंवर एकच स्लॅब ठेवण्याची सुचना करणे, सोपे आहे. मात्र, आम्ही कोणत्याही एका वस्तू किंवा खाद्यपदार्थावर शून्य टक्के जीएसटी लावणार नाही, असे सांगून दूध आणि मर्सिडीज गाडीवर सारखाच कर लावता येईल का?,’ असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जीएसटी लागू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मोदी बोलत होते.  

यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षातील आमचे मित्र म्हणतात की जीएसटीचा दर एकच ठेवायला हवा. मग आम्ही खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंवरही कर लावायचा का? या वस्तूंवर सध्या शून्य, पाच किंवा १८ टक्के कर लावला जातो.

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत ६६ लाख इंटरप्रायझेसची नोंदणी झाली आहे. पण जीएसटी लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच ४८ लाख नव्या नोंदणी झाल्या आहेत. ३५० कोटी पावत्यांवर प्रक्रिया झाली. तर ११ कोटी कर परतावे भरले गेले. जीएसटी किचकट आहे, असा आरोप करण्यापूर्वी या वस्तूस्थिती बघणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.