दुसरी पत्नी आणि कन्येच्या वादामुळेच भैयुजी महाराजांची आत्महत्या

162

इंदौर, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रीय गुरु भैयुजी महाराज यांच्या आत्महत्येचे गुड उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. १२ जून ला भय्यूजी महाराजांनी इंदुरातील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी दोन सुसाइड नोट आढळल्या होत्या. त्यावेळी सुसाइड नोटवरील अक्षर भय्यूजी महाराजांचे नव्हतेच अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी सुसाइड नोट हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासण्यासाठी पाठवली होती. तिचा तपास अहवाल शनिवारी (दि.७) पोलिसांना प्राप्त झाला.
तपास अहवालानुसार, आढळलेली सुसाइड नोट ही खुद्द भय्यू महाराजांनीच लिहिली होती. पोलिसांच्या मते, इतर चौकशी रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. सर्व रिपोर्ट मिळाल्यानंतरच पोलिस कोर्टात केस डायरी सादर करतील. पोलिसांच्या चौकशीतून कौटुंबिक कलह, मानसिक तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती हे मुख्य कारणे मानण्यात आली. जवळपास २६ जणांच्या जबाबांनंतर पोलिसांनी कुणालाही आत्महत्येसाठी दोषी ठरवले नाही. महाराजांच्या मानसिक ताणाचे मुख्य कारण दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि कन्या कुहूमधील भांडण असल्याचे आढळले आहे.