दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल

187

पुणे, दि. ७ (पीसीबी) – विशाखापट्टणम कसोटीत भारतीय  संघाने विजय मिळवल्यानंतर दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ आज (सोमवार) दुपारी पुण्यात दाखल झाला. दक्षिण आफ्रिकेविरोधातील    दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून  गहुंजे येथील मैदानावर खेळवला जाणार आहे.

आज दुपारी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले. यावेळी आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केली होती. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला या कसोटीत  विजय मिळवणे गरजेचे आहे.

दरम्यान,  सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांच्या शतकी खेळी आणि रविचंद्रन आश्विन-मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्यामुळे आफ्रिकेचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

 

WhatsAppShare