दुर्देवी: आंबेडकर जयंती साजरी करुन परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला अपघात; पाच जणांचा मृत्यू; आठ महिन्यांच्या बाळाचाही समावेश

78

बुलडाणा, दि. १५ (पीसीबी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी मध्य प्रदेशातील महू येथे गेलेल्या एका कुटुंबाच्या स्कॉर्पिओ कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ महिन्यांचे बाळही दगावले. हा भीषण अपघात रविवारी (दि.१४) रात्री उशीरा मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ झाला.  

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी जुमडे कुटुंब डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी मध्य प्रदेशातील महू येथे स्कॉर्पिओ कारने गेले होते. यावेळी कार्यक्रम उरकुन ते रात्री उशीरा मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ आले असता त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. यामध्ये जुमडे कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ महिन्यांचा बाळाचाही मृत्यू झाला.  यामध्ये अनखी दोघे गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी आहे. जुमडे कुटुंब मेहकर तालुक्यातील अंजनी गावचे रहिवासी होते. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.