दुबईमध्ये झालेल्या भीषण बस अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू

166

दुबई, दि. ७ (पीसीबी) – साई बोर्डाला बस धडकून झालेल्या भीषण अपघातात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे, अशी माहिती आज (शुक्रवार) भारताच्या वाणिज्य दूतावासाने दिली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.६) संध्याकाळी ६ च्या दरम्यान मस्कटहून दुबईच्या मार्गे जाणारी एक बस शेख मोहम्मद बिन जायद रोडच्या साइन बोर्डाला धडकली. यामध्ये एकूण १७ जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये ८ भारतीयांचा समावेश आहे. वाणिज्य दूतावास काही मृतांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. तर इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरून इतर कुटुंबीयांना याची कल्पना देता येईल, असेही भारतीय वाणिज्य दूतावासाने स्पष्ट केले आहे. दुबई पोलिस अधिक तपास करत आहेत.