दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मोबाईल पळवला

41

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या डॉक्टर महिलेच्या एप्रॉनमध्ये ठेवलेला मोबाईल दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी चारच्या सुमारास बर्डव्हॅली समोरील विद्यानगर चिंचवडकडे जाणा-या रस्त्यावर घडली.

डॉ. प्रियंका सखाराम वराळे (वय 28, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. प्रियंका वराळे या त्यांच्या दुचाकीवरून विद्यानगरकडे चालल्या होत्या. त्या बर्डव्हॅली हॉटेलसमोरून जात असताना त्यांच्या मागून एका दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या एप्रॉनमध्ये ठेवलेला मोबाईल चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare