दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांस चौघांनी लुटले

198

थेरगाव, दि. ६ (पीसीबी) – मित्राला त्याच्या घरी सोडण्यासाठी जात असताना चार जणांनी मिळून दुचाकी अडवली. दोन्ही मित्रांना मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम काढून घेतली. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री दीड वाजता थेरगाव लिंक रोड येथे घडली.

किरण दादासाहेब गोमे (वय 24, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोमे हे शनिवारी मध्यरात्री त्यांच्या मित्र यासीन याला त्याच्या घरी सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते थेरगाव लिंक रोड येथे आले असता चार जणांनी त्यांना अडवले. यासीन याच्या खिशातून जबरदस्तीने आठ हजारांचा मोबाईल फोन आणि 700 रुपये रोख रक्कम आरोपींनी काढून घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्या खिशातून 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.