दुकानावर दगडफेक करून दुकानदाराला लुटले

78

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – दुकानावर दगडफेक करून शटर व दुकानाच्या बोर्डचे नुकसान केले. तसेच दुकानदाराच्या खिशातून दोन हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री दीडच्या सुमारास बाबा हरदासराम मंडलीच्या मागील गल्लीत, पिंपरी येथे घडली.

आशिष विनोदकुमार चंदनानी (वय 21, रा. गुरुनानक मार्केट, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गब्बर उर्फ राहुल उत्तम इंगवले (वय 21, रा. पिंपळे सौदागर), राजेश रामगोपाल यादव (वय 21, पत्ता माहीत नाही) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गब्बर आणि राजेश या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानावर दगडफेक करून दुकानाचे शटर व दुकानाच्य बोर्डचे नुकसान केले. तसेच शिवीगाळ करून फिर्यादीच्या खिशातील दोन हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare