दीपक केसरकरांनी अनेकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केले – बबन साळगावकर  

153

सिंधुदुर्ग, दि. ११ (पीसीबी) – गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे जादूगार आहेत.  करणी करुन त्यांनी नारायण राणे यांचा पक्ष प्रवेश अडकवला आहे. त्यांनी अनेकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केले, असा आरोप शिवसेनेचेच नगराध्यक्ष बबन साळगावकर  यांनी केला आहे.  शिवसेनेतूनच झालेल्या या आरोपाने  जिल्ह्यात  खळबळ  उडाली आहे.

मात्र, दीपक केसरकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  ते म्हणाले की,  आतापर्यंत मी बबन साळगावकर यांना माझा राजकीय वारस म्हणत होतो.  मात्र,  अशा आरोपांमुळे यापुढे माझे ते राजकीय वारसदार नसतील. तसेच बबन साळगावकर यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच आहे, त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.

भाजपसोबत शिवसेनेची युती आहे. गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही राडा झाला नाही. ही जादू मी केली. ही जादू असेल ती मी पाच वर्षात जादू करुन दाखवली. केलेल्या कामांच्या गमछ्या मारत बसू का,  असा टोला दीपक केसरकर यांनी बबन साळगावकर यांना लगावला.