दिव्यांग सेनेच्या शहर सरचिटणीसपदी जहांगीर रहेमान शेख

72

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – दिव्यांग सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस या पदावर जहांगीर रहेमान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

कर्णबधिर, अंध, मतिमंद, शारीरिक अपंग यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.