दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसून अपघात,अपघातात संत नामदेव महाराजांच्या वंशजांचे निधन

501

पुणे,दि.१९ (पीसीबी)-दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसल्याने दोन जण ठार झाले आहेत. तर १५ वारकरी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. जखमींवर हडपसरच्या नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नामदेव महाराजांचा पालखी सोहळा कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून आळंदीला जात असताना वाटेत दिवे घाटात हा अपघात झाला. सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन वारकऱ्यांची नावे आहेत. मृतांपैकी सोपान नामदास हे नामदेव महाराजांचे १७ वे वंशज आहेत.या घटनेमुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

WhatsAppShare