दिवसा आमच्यासोबत आणि रात्री काँग्रेससोबत; सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका

164

मुंबई,दि.२०(पीसीबी) – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेनं २०१४ साली भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव मांडला होता, असं वक्तव्य केलं. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

२०१४ पासून काँग्रेस-शिवसेना असल्याचा खुलासा धक्कादायक आहे. शिवसेनेचा सत्तामोही चेहरा समोर आला. दिवसा आमची सोबत आणि रात्री काँग्रेसशी चर्चा हे क्लेशदायक आहे, असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत.

सत्ता जाऊ नये म्हणून सावरकरांच्या विचारांकडे डोळेझाक आणि सत्ता टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो, असा आरोपही मुनगंटीवारांनी यावेळी केला आहे.

WhatsAppShare