दिल्ली सामुहिक हत्याकांड; भिंतीवरील ११ पाईपचे गूढ उलगडले

275

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – दिल्लीतील एका कुटुंबातील ११ जणांच्या सामुहिक आत्महत्या  प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहे. भिंतीवर आढळून आलेले ते ११ पाइप नेमके कशासाठी होते, याचा उलगडा या कुटुंबाची नातेवाईक सुजाता यांनी केला आहे.

या पाइप्सचा ११ जणांच्या मृत्यूंशी काही संबंध नाही, असे सुजाता यांनी म्हटले आहे. हे पाइप तंत्र-मंत्र किंवा एखाद्या काळ्या जादूमुळे लावले असतील, अशी शक्यताही सुजाता यांनी धुडकावली. हे पाइप सोलर प्रोजेक्ट आणि व्हेंटिलेशनसाठी आणण्यात आले होते. हे कुटुंब धार्मिक होते. मात्र, काळ्या जादूच्या आहारी गेलेले नव्हते, असे सुजाता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, घरातील वयोवृद्ध नारायणी देवी यांचा लहान मुलगा ललितने सर्वांना ‘टांगलं’ आणि हे संपूर्ण प्रकरण तंत्र-मंत्राशी जोडलेले आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. घरात ११ मृतदेह, एका भिंतीवर ११ पाइप, ११ खिडक्या आणि ११ कोने होते. हा निव्वळ योगायोग होता, की या क्रमांकाशी या मृत्यूचा काही संबंध आहे, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.