दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा

74

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – भारताचा माजी क्रिकेटपटू मदनलाल यांचा पराभव करून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने या निवडणुकीत १२ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शर्मा यांनी मदनलाल यांचा ५२७ मतांनी पराभव केला. शर्मा यांना १५३१, मदनलाल यांना १००४ आणि विकास सिंह यांना २३२ मते मिळाली.

शर्मा यांच्या विजयाने बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राकेश खन्ना यांच्या पत्नी शशी  यांचा २७८ मतांनी पराभव केला. राकेश बंसल यांना १३६४ मते पडली. तर शशी खन्ना यांना १०८६ मते मिळाली.

राकेश बंसल हे डीडीसीएचे माजी अध्यक्ष स्नेह बंसल यांचे धाकटे बंधू आहेत. सुमारे तीन दशकांपासून सीके खन्ना यांचे डीडीसीएवर वर्चस्व होते. त्यामुळे त्यांच्या वर्चस्वाला शर्मा यांच्या पॅनेलने धक्का दिला आहे.