दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचे षड्यंत्र; सतर्कतेचे आदेश

0
390

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनी किंवा त्यापूर्वी मोठा घातपात घडवून आणण्याचे षड्यंत्र अतिरेक्यांनी रचल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील सरकारी इमारतीत प्लबंर असल्याचे सांगून प्रवेश करून घातपात घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी रचला आहे. यापार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

‘जैश-ए- मोहम्मद’कडून हा घातपात घडवून आणला जाणार आहे, असा इशारा आयबीने दिला आहे. सरकारी इमारती, विमानतळ, रेल्वेस्थानक, मॉल आणि शाळांमध्ये घातपात घडवून आणला जाऊ शकतो. यासाठी तीन अतिरेकी दिल्लीत घुसले असून प्लंबर बनून ते हा स्फोट घडवून आणू शकतात, असे आयबीने म्हटले आहे. दिल्ली पोलिसांसह अर्ध सैनिक दलाला सतर्क राहण्याच्या सूचनाही आयबीने दिल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिल्लीत आलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक विभागावर लक्ष ठेवले जात आहे. कुणालाही कोणत्याही चौकशीशिवाय नोकरीवर न ठेवण्याच्या सूचनाही सरकारी-खासगी अस्थापनांना दिल्या आहेत. विमानांच्या मार्गात किंवा रनवेवर ड्रोन किंवा कोणताही अडथळा आल्यास तो धोका समजण्यात यावा, अशा सुचना आयबीने विमानतळ प्राधिकरणाला दिल्या आहेत.