दिल्लीतील लाल किल्ला परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक

136

दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी आज (शुक्रवार) अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या परिसरात दहशतवाद्यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

परवेझ रशिद आणि जमशेद जहूर असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने लाल किल्ला परिसरातील काश्मिरी गेट येथून आज (शुक्रवार) परवेझ रशिद आणि जमशेद जहूर या दोन जणांना अटक केली. हे दोघेही आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. दोघेही मूळच्या शोपियाँ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांपैकी एकाच्या नातेवाईकाचा चकमकीत मृत्यू झाला होता. त्यानंतर दोघेही दहशतवादी संघटनेत सामील झाले. दिल्ली पोलिसांची विशेष शाखा तपास करत आहे.