दिलीप वळसे पाटील सुध्दा कोरोना बाधित

10

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – देशातील आणि राज्यातीलही अनेक बडे नेते आता कोरोना बाधितांच्या यादीत येत आहेत. केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
ठाकरे सरकारमधील वयाने आणि अनुभवाने सर्वांत जेष्ठ असलेले कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.
माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन वळसे पाटील यांनी केलंय.

WhatsAppShare