दिघीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पळवला पावनेदोन लाखांचा ऐवज

192

दिघी, दि. २० (पीसीबी) – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही असा एकूण १ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. १९) पहाटे सहाच्या सुमारास साई पार्क दिघी येथे घडली.

याप्रकरणी मधुकर मारुती शिंदे (वय ५८, रा. गुरुदत्त कॉलनी, साई पार्क, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार शिंदे यांचे दिघी साई पार्क येथे घर आहे. सोमवारी (दि. १८) रात्री सात ते मंगळवारी (दि. १९) सकाळी सहाच्या सुमारास त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.  आणि कपाटात ठेवलेले ४१.२ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि टीव्ही असा एकूण १ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.