दिघीत पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; संतप्त जमावाची बसवर दगडफेक

380

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – दिघीहून भोसरीगावाकडे निघालेल्या पीएमपी बस क्र. (एमएच/१२/एचबी/०७१६) ने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. यावरून संतप्त जमावाने पीएमपी बसवर दगडफेक करुन बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास दिघी-भोसरी रस्त्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास दिघीहून भोसरीकडे जाणाऱ्या पीएमपी बस क्र. (एमएच/१२/एचबी/०७१६) ने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. यामुळे संतप्त जमावाने बसवर दगडफेक करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आणि बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दिघी पोलिस तपास करत आहेत.