दिघीत गाईंना बेशुध्द करुन केली जात होती कत्तल; कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्यावर अंगावर कार घालून आरोपी फरार

64

दिघी, दि. १३ (पीसीबी) – दिघीतील मॅगझिन चौकातील प्रगती हॉटेलच्या पाठीमागच्या मोकळ्या मैदानात गाईंची कत्तल केली जात असल्याची माहिती एका खबऱ्याने दिघी पोलिसांना फोनव्दारे दिली होती. यावर दिघी पोलिसांनी आज (सोमवार) पहाटे तीनच्या सुमारास काही ग्रामंस्थांना घेऊन त्या ठिकाणी धाड टाकली. धाड टाकल्याचे लक्षात येताच आरोपींनी गोमासाने भरलेली कार पोलिसांच्या अंगावर टाकून तेथून फरार होण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले. यावर ग्रामंस्थांनी कार उडवून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी कार सोडून फरार झाले.