दिघीत कोयत्याचा धाक दाखवून कारचालकाला लुटले; सव्वा लाखांचा ऐवज घेऊन हल्लेखोर पसार

278

दिघी, दि. ३१ (पीसीबी) – कोयत्याचा धाक दाखवून तीन हल्लेखोर कारचालकाला लुटून पसार झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. ३०) दुपारी चारच्या सुमारास  दिघी पोलिस स्टेशन हद्दीतील आळंदी पुलाजवळ असलेल्या हॉटेल सावली समोर घडली.

मल्हारी काळे (वय ४६, रा. आळंदी-देवाची) असे मारहण करुन लुटण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिघी पोलिस ठाण्यात तिन अनोळखी हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी मल्हारी हे त्यांच्या ताब्यातील नॅनो कारने आळंदी पुलाजवळ असलेल्या हॉटेल सावली समोरील रस्त्यावरुन घरी जात होते. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या तिघाजणांनी मल्हारी यांना कार बाजूला घ्यायला लावून त्यांच्या नॅनो कारच्या काचा फोडल्या. तसेच त्यांना मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील एक मोबाई, ७ हजार ५०० रुपये रोख आणि एक सोन्याची चेन असा एकुण १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिस्कावून नेला. दिघी पोलिसांनी याप्रकरणी तिन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस.एस.भुजबळ तपास करत आहेत.