दिघीत अज्ञातांनी घरासमोरील दुचाकी पेटवली

294

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञातांनी पेटवून फरार झाले. ही घटना सोमवारी रात्री उशीरा साडेतीनच्या सुमारास सर्वे.नं.३, समर्थनगर, दिघी येथे घडली.  

याप्रकरणी दुचाकी मालक राजु शब्बीर खान (वय ३५, रा. सर्वे.नं.३, समर्थनगर, दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान हे दिघीतील सर्वे.नं.३, समर्थनगर येथे राहतात. सोमवारी रात्री त्यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच/१२/जीजे/५८७१) ही त्याच्या घरासमोरील रस्त्यावर उभी केली होती. यावेळी रात्री साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात आरोपींनी त्यांची दुचाकी पेटवून फरार झाले. या घटनेत दुचाकीचे साडेतीन हजार रुपयांचे नुकसान करुन झाले आहे. दिघी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.