दारू पिऊन पत्नीला मारहाण; पतीवर गुन्हा दाखल

40

चिखली, दि. २७ (पीसीबी) – दारू पिऊन पत्नीला मारहाण केली. तसेच तिचा घरगुती शुल्लक कारणांवरून शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील रमेशराव गावंडे (वय 41, रा. चिखली प्राधिकरण) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पिडीत पत्नीने सोमवारी (दि. 26) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती स्वप्नील याने दारू पिऊन फिर्यादी विवाहितेला कोणत्या ना कोणत्या शुल्लक कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली. ‘तु काळी आहेस. तू माझ्या योग्य नाही. उगाच मी तुझ्याशी लग्न केले. मला तुझ्यापेक्षा चांगल्या मुली मिळाल्या असत्या.’ असे बोलून विवाहितेचा अपमान केला.

विवाहितेने तिच्या बाळाच्या सेरेलॅक, औषधे, दवाखाना खर्च यासाठी पैसे मागितले असता स्वप्नील याने ‘तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये’ असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन, कामावरचा राग काढत; जेवण चांगले बनवत नाही. भाजीमध्ये मीठ कमी पडले. यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare