दारूला पैसे न दिल्याने तरूणाचा डोक्यात दगड घालून खून

127

पुणे, दि.१७ (पीसीबी) – पुण्यातील मामलेदार कचेरी जवळ झोपलेला तरूणाने दारूसाठी पैसे न दिल्याने, त्याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाबासाहेब कुऱ्हाडे या आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास खडक पोलिस करत आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बाबासाहेब कुऱ्हाडे या आरोपीने एका तरुणांकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र त्या तरूणाने पैसे देण्यास नकार दिल्याने बाबासाहेब याने हा राग मनात धरून तरूणाचा पाठलाग केला. त्यानंतर तो तरूण जेव्हा मामलेदार कचेरी जवळील फुटपाथवर झोपला. तेव्हा रात्री दोन वाजेच्या सुमारास बाबासाहेब कुऱ्हाडे याने तरूणा जवळ जाऊन बाजूलाच असलेला दगड त्याच्या डोक्यात घातला. यानंतर त्या तरुणाच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे झाले आणि पळून जाणार्‍या बाबासाहेबला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत तरूणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही.