दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये; विजय मल्ल्यावर उध्दव ठाकरेंची टीका   

41

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांने इतक्या वर्षांनंतर न्यायालयात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती, मग ते इतकी वर्षे लपवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून मल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये,असेही त्यांनी म्हटले आहे.