दापोडी ते निगडी बीआरटी मार्गावर खासगी वाहनांना बंदी; पोलिसांनी नागरिकांकडून मागवल्या हरकती व सूचना

269

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी ते दापोडी मार्गावर सुरू केलेल्या बीआरटी रस्त्यावर खासगी वाहनांना पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच या बंदीबाबत नागरिकांकडून पोलिस आयुक्तांनी १२ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटीएस मार्ग सुरू करण्याचे गेल्या पाच-सात वर्षांपासून प्रलंबित होते. उच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या या मार्गावर न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने बीआरटी बससेवा नुकतीच सुरू केली आहे.

आता या बीआरटी मार्गावर अत्यआवश्क सेवीतील वाहन म्हणजे रुग्णवाहिक, फायरब्रिगेड, पोलीस वाहने आणि पीएमपी बस सोडून इतर वाहनांना या जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे. त्याबाबत अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी आदेश जारी केला आहे.

तसेच या बीआरटी मार्गावर खासगी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याच्या निर्णयावर नागरिकांकडून हरकती व सूचनाही मागविण्यात आली आहे. नागरिकांनी येत्या १२ सप्टेंबरपर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयाकडे लेखी स्वरुपात हरकती व सूचना कराव्यात, असे आवाहन रानडे यांनी केले आहे.