दापोडी ते निगडी बीआरटी मार्गावर खासगी वाहनांना बंदी; पोलिसांनी नागरिकांकडून मागवल्या हरकती व सूचना

108

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी ते दापोडी मार्गावर सुरू केलेल्या बीआरटी रस्त्यावर खासगी वाहनांना पोलिसांनी बंदी घातली आहे. तसेच या बंदीबाबत नागरिकांकडून पोलिस आयुक्तांनी १२ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटीएस मार्ग सुरू करण्याचे गेल्या पाच-सात वर्षांपासून प्रलंबित होते. उच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या या मार्गावर न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने बीआरटी बससेवा नुकतीच सुरू केली आहे.