दापोडीत मटका; म्हाळुंगेमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचे छापे

769

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – अवैधरित्या सुरु असले्या जुगार आणि मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलीस अशा प्रकारच्या व्यवसायावर आळा घालत आहेत. शहर परिसरातील दोपोडी येथे सुरु असलेला मटका आणि म्हाळुंगे येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोपोडी येथील कारवाईत एक इसम दापोडी रेल्वे फाटकाजवळ मटक्याचा अड्डा चालवत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना सोमवारी मिळाली होती. पोलिसांनी तातडीने त्या ठिकणी छापा टाकून. आरोपी प्रवीण गायकवाड याला अटक केली. तसेच त्याच्या कडून मटका खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम हस्तगत केली. तर म्हाळुंगे येथील कारवाईत महाराष्ट्र वजन काट्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने तेथे धाड टाकून  मारुती हनुमंत म्हेत्रे (वय ४५, रा. म्हाळुंगे, मुळशी) आणि त्याचा साथीदार बाबासाहेब शंकर कांबळे (वय ३७, रा. म्हाळुंगे, मु.रा. परभणी) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. तसेच जुगाराचे साहित्य आणि रोख १७०० रुपये जप्त करण्यात आले.