दापोडीत पोटच्या मुलाने आईला केली रॉडने मारहाण

124

दापोडी, दि. १५ (पीसीबी) – घरघुती वादातून पोटच्या मुलाने आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. ही धक्कादायक रविवारी (दि.१४) रात्री दिडच्या सुमारास सिध्दार्थनगर दापोडी येथे घडली.

याप्रकरणी ५५ वर्षीय जखमी आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा अतुल नवनाथ डांगे (रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल हा जखमी ५५ वर्षी महिलेचा मुलगा आहे. रविवारी रात्री दिडच्या सुमारास तो त्याच्या आईच्या घरात घुसला. तसेच घरघुती कारणाच्या वादातून आईच्या अंगावर मिरचीची पुड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. अतुल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलिस तपास करत आहेत.