दापोडीत पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर कोयत्याने वार

2084

दापोडी, दि. ३१ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाने दोघा मावस भावांवर कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास दापोडीतील जयभिमनगर येथील कुलकर्णी चाळीजवळ घडली.

अभिषेक राजु चव्हाण (वय २६, रा. चव्हाण चाळ, जयभिमनगर, दापोडी) आणि ऋतीक संकपाळ असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या दोघा मावस भावांची नावे आहेत. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलीसांनी त्यानुसार आल्या उर्फ अॅलविन रवी राजगोपाळ (वय १९, जाधव चाळ, जयभिमनगर, दापोडी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अॅलविन याने पूर्वी किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन अभिषेक आणि त्याचा मावस भाऊ ऋतीक या दोघांवर कोयत्याने हल्ला चडवला. आरोपी अॅलविन याने अभिषेक याच्या डोक्यात आणि डाव्या हातावर वार केले तसेच ऋतीक यांच्या डाव्या खांद्यावर वार केले. या घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीसांनी अॅलविन याला कोयत्यासह अटक केली आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे अधिक तपास करत आहे.